Shiv sena Chief Uddhav Thackeray | सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी पैसे नाहीत : उद्धव ठाकरे

मुंबई : Shiv sena Chief Uddhav Thackeray | भारत घडवणारी खरी शक्ती तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत? यांच्याकडे जाहिरातींवर उधळायला पैसे आहेत. सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण अंगणवाडी आणि आशा सेविकांना मानधन द्यायला सरकारकडे पैसे नाहीत हे सरकार तुमचं आहे का? यावेळी भाजपाला (BJP) मत द्यायचं नाही असं आत्ता कुणीतरी म्हणालं. तुम्हाला योग्य वाटत असेल नक्की तसे करा, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv sena Chief Uddhav Thackeray) यांनी मुंबईत केला.

अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात (State Govt) काढलेला मोर्चा (Anganwadi Morcha) मुंबईत आला असून या मोर्चात सहभागी होत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारचे वाभाडे काढले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, सावित्रीच्या लेकी इथे आल्यात. पण सावित्रीबाईंच्या ज्योती तुमच्यात तेवतात की नाही हा प्रश्न आहे. असंख्य ज्योती एकत्र आल्यावर मशाल पेटते. ती मशाल कुणाचीही सत्ता जाळून खाक करु शकते. तुमच्या हातांमध्ये ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात त्यांनी टाळ्या वाजवल्यावर इतका आवाज येतो, हा आवाज सरकारच्या कानाखाली काढला तर केवढा मोठा येईल?

उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा मला खेद आहे. मधल्या काळात मी मुख्यमंत्री होतो.
माझ्याकडे काही लोक आले, मी त्यांना सांगितले की मुख्यमंत्री असताना काही करु शकलो नाही. त्यावेळी माझ्याबद्दल काहीही तक्रार नाही असेही त्यांनी सांगितले. करोनाचा सामना आपण केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार तुमचं काही ऐकत नाही हे वास्तव आहे. कारण करुणा, दयाबुद्धी तुमच्यात आहे.
आंदोलन पेटले की मंत्री येतात. पुढच्या अधिवेशनात निकाल लावतो सांगतात.
अरे पुढच्या अधिवेशनात तुझे सरकार राहणार का?

उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचे संकट टळले, कामाला सुरुवात केली तेव्हा माझे ऑपरेशन झाले.
त्यातून उभा राहिलो तर या गद्दारांनी सरकार पाडले. पण सरकार पाडले नसते तर आज तुमच्यावर आंदोलन करण्याची
वेळ आली नसती. तुमची ताकद, तुमची सेवा ज्यांना समजत नाही ते कृतघ्न आहेत.
यांच्या काळात आपण जाहिराती पाहतोय. (Shiv sena Chief Uddhav Thackeray)

आरोग्य मंत्र्यांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, गुटगुटीत मंत्री म्हणजे सुदृढ भारत नाही.
आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन. मात्र खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचे काम अंगणवाडी सेविका
करत आहेत. मात्र याची जाणीव सरकारला नाही.

ठाकरे म्हणाले, २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आहे. मग तुम्ही रामभक्त नाही का? मध्य प्रदेशात भाजपाला
लाडली बहेना योजना लाभली. मग या आमच्या लाडली बेहना आहेत ना? रामभक्त आहेत मग त्यांचे काय?
महायुती सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, या सरकार पेक्षा खेकडा बरा इतके ते तिरके आहे.
आम्हाला तिघाडी सरकार म्हणत होते. आता यांचे काय झाले आहे ते बघा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

लंडन ते मुंबई प्रवासात 152 ग्रॅम सोने गायब, पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल