‘मी पुन्हा येईन’ घोषणेवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना ‘चिमटा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ‘मी पुन्हा येईन’ कविता सादर केली होती. त्यानंतर अनेक सभांमध्ये त्यांनी मी पुन्हा येईल असे म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. यावरून सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख यांनी देखील औरंगाबादमध्ये चिमटा काढला आहे. उद्धव ठाकरेंनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

शेतकऱ्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. पाऊस जाताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी सत्तेचा तिढा केव्हा सुटणार यावर भाष्य करण्याचे टाळले. शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशावेळी सत्ता स्थापनेचा विचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. तसेच पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावं, असे उद्धव ठाकरे म्हणले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या