Shiv Sena chief Uddhav Thackeray | अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार, मातोश्रीवर बैठक; ठाकरेंकडून आमदारांना महत्त्वाच्या सूचना

मुंबई : काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री निवास्थानी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन (Legislative Winter Session) ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत असल्याने त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी आमदारांना पाच महत्वाच्या सूचना या बैठकीत केल्या आहेत.

मराठा (Maratha Reservation) विरुद्ध ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाद, अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेला राज्यातील शेतकरी, बीडमधील हिंसाचार, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण (Lalit Patil Drug Case) आणि त्यामध्ये मंत्र्यांचे आलेले नाव, मंत्री भुजबळ यांची सरकारविरोधी भूमिका, हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात आमदारांची बोलावलेली बैठक जवळपास दीड तास चालली होती. या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना अधिवेशन काळात सरकारविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी आमदारांना सूचना करताना म्हटले आहे की,
हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आपली भूमिका ठामपणे मांडा.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या बांधावर जा.
शेतकऱ्यांच्या नुकसानाची तीव्रता जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत जास्तीत जास्त मदतीची मागणी करा.

आमदारांना सूचना देताना ठाकरे यांनी म्हटले आहे की, पीक विम्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडा.
तसेच मुंबईमधील आमदारांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घ्यावी.

दरम्यान, आगामी हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधी होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | भुजबळांना स्वगृहीच गावबंदी! आक्रमक झालेला मराठा समाज रस्त्यावर, येवला दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार
Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग
ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sassoon Dean Dr. Vinayak Kale | ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती