युतीचं बिनसलं ? उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले ‘हे’ 15 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ठाकरे घरातील व्यक्तीवर आणि ठाकरे कुटूंबावर पहिल्यांदा खोटारडेपणाचा आरोप लावण्यात आला असे ते म्हणाले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्यावर खोटारडे आरोप लावण्यात आले. परंतू खोटे बोलायला मी भाजप नाही. ठाकरे घरातील व्यक्तीवर आणि ठाकरे कुटूंबावर पहिल्यांदा खोटारडेपणाचा आरोप लावण्यात आला.

अमित शाह आणि कंपनीने किती खोटे बोलले हे जनतेला माहित आहे. जनतेने पाहिले आहे की कोण किती खोटे बोलतो. भाजपला आपण शत्रू मानत नाही परंतू खोटं बोलू नये. ठरलं नव्हतं असं म्हणू नये कारणं तो माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे म्हणत भाजपवर पलटवार केला. शिवसेनेने मोदींवर टीका केली असे सांगितले गेले. हरियाणात दुष्यंत चौटाला मोदींना वाटेल ते बोलले परंतू त्यांच्याशी युती होऊ शकते असे ही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्वाचे मुद्दे –
1) मी फडणवीसांच्या फोन उचलला नाही.

2) फडणवीस मला खोटं पाडत होते आणि मला खोटं पाडणाऱ्या माणसाशी बोलायचे नाही.

3) भाजप सरकार कसे स्थापन करणार, बहुमत नसताना भाजप सरकार कसे स्थापन करणार?

4) माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. परंतू आम्हाला हा खोटेपणा सहन होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा बाळासाहेबांच्या मुलावर विश्वास आहे.

5) राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्तास्थापनेसाठी कोणतीही चर्चा झाली नाही.

6) तुमचे पर्याय खुले असतील तर सत्ता स्थापनेला उशीर का करतात.

7) ठरलं होतं पण देऊ शकत नाही असे म्हणले असते तर चालले असते परंतू खोटं बोलायला मी भाजप नाही.

8) खोटं कोण बोलतंय हे जनता बघते आहे. भाजपला मी मित्रपक्ष म्हणूनच लोकसभेत युती केली. पण निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेला अवजड उद्योग खातं दिलं.

9) खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं हे आरएसएसनी सांगावे.

10) मोदींबद्दल मी कधीही वाईट बोललो नाही, मोदी मला लहान भाऊ मानतात.

11) फडणवीस चांगले मित्र आहेत, ते मुख्यमंत्री होते म्हणून आम्ही पाठिंबा दिला.

12) शिवसेना प्रमुखांच्या मुलगा खोटं बोलतोय हे मला चालणार नाही, फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती.

13) अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची मला गरज नाही, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणारच.

14) शिवसेनेने दिलेला शब्द पाळला. पहिल्यांदाचा शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप.

15) समसमान जागा वाटपाचं आमचं ठरलं होतं. अमित शाह, फडवणीस यांनी आमच्याकडे येईल चर्चा देखील केली.