×
Homeताज्या बातम्याShivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

मुंबई : Shivsena Chief Uddhav Thackeray | दसरा सण (Shivsena Dasara Melava 2022) म्हणजे सकाळी नागपूरात (Nagpur) सरसंघचालकांचे भाषण, नागपूरातील दीक्षा भूमीवर दिवसभर दर्शनासाठी येणारी लाखोची गर्दी, भगवान गडावर (Bhagwangarh) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे भाषण आणि सायंकाळी शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे भाषण हिच राजकीय घडामोडी ठरलेल्या होत्या. पण शिवसेनेत उभी फुट पडली आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) मदतीने मुख्यमंत्रीपद पटकाविले. आपलीच शिवसेना खरी हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एकप्रकारे शिवसेना पक्षच हायजॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांच्यामागे केंद्र सरकार, भाजपपासून सर्व यंत्रणा मदतीस तयार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतच्या त्यांच्या २० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण कालखंडाला तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री असताना राज्य सरकार म्हणून ते कायद्याच्या लढाईत ज्या ज्या केसेस राज्य शासनाविरुद्ध दाखल झाल्या, त्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. आता पक्षप्रमुख म्हणूनही कायद्याच्या लढाईत त्यांना हार मानावी लागणार काय अशी परिस्थिती समोर येऊन ठाकली आहे. (Shivsena Chief Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने (Supreme Court) आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. शिवसेनेकडून गेल्या तीन महिन्यात दाखल केलेल्या सर्व दाव्यांवर सर्वाच्च न्यायालयाने सुरुवातीला तारीख पे तारीख करीत वेळ काढूपणा केला आहे. त्यातून एकनाथ शिंदे सरकार स्थिरस्थावर झाले आहे. न्यायालयाने हे खंडपीठाकडे सोपविले आहे. खंडपीठाने फक्त निवडणुक चिन्हाचा निर्णय निवडणुक आयोग (Election Commission Of India) घेऊ शकते, असा एकच निर्णय घेतला आहे. (Shivsena Chief Uddhav Thackeray)

निवडणुक आयोगाने एक महिन्यात हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. निवडणुक आयोग हा तठस्थ असल्याचे कागदावर कितीही दिसत असले तरी सर्वाच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात पाल चुकचुकली आहे.

एका बाजूला सर्वाधिक आमदार हे आपल्या बाजूला असल्याचे शिंदे यांनी विधानसभेत दाखवून दिले आहे. तसेच शिवसेनेचे सर्वाधिक खासदार आपल्या बाजूला असल्याचे संसदेत दाखविले आहे. आता फक्त जनता जर्नादनाच्या दरबारात हे दाखविण्याचे काम बाकी आहे. ते दसरा मेळाव्याच्या रुपाने आज सायंकाळी दाखवून देण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.

आजवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला किती शिवसैनिक आले, याची गणती केली जात नव्हती. शिवसेनाही इतर भागातून बसने लोकांना आणण्यावर भर देत नव्हती. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरातील शिवसैनिक दसर्‍याला शिवतीर्थवर जमा होत होते.

आज मात्र, शिंदे गटाने बीकेसीवर (BKC Ground, Mumbai) भव्य मेळावा घेण्याचा चंग बांधला आहे.
त्यासाठी संपूर्ण राज्यातून अगदी नागपूर, विदर्भातून बसगाड्या भरुन, रेल्वेने कार्यकर्ते मुंबईत येतील याची तजवीज केली आहे.
शिवतीर्थापेक्षा अधिक गर्दी बीकेसीवर जमल्याचे दाखवून द्यायचे आहे.

शिंदे गटाने लोक आणण्यासाठी ज्या पद्धतीने यंत्रणा कामाला लावली, पाण्यासारखा पैसा घातला.
तसा कोणताही प्रयत्न शिवसेनेकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला नाही.
त्यामुळे आताचे चित्र तरी शिवतीर्थापेक्षा बीकेसीवर अधिक गर्दी होणार असल्याचे दिसून येत आहे.
त्याशिवाय सर्व यंत्रणा शिंदे यांच्याबाजूने असल्याने पक्षचिन्हाबाबत एकतर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागेल किंवा
चिन्ह गोठविले जाऊ शकते़ (त्यातही शिंदेचा विजय मानला जाईल) असे अनुमान काढायला जागा आहे.
त्यामुळे पक्षपातळीवर आमदार, खासदार व त्यांचे कार्यकर्ते या पातळीवर उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष संघटन
गेले असताना कायद्याच्या लढाईतही अपयश येण्याची शक्यता आहे असे दिसून येत आहे.

Web Title :- Shiv Sena Chief Uddhav Thackeray | Will Shivsena Chief Uddhav Thackeray fight a defeating battle?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrakant Khaire | ‘दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने 52 कोटी वाटले’, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा; अ‍ॅमेझॉनच्या लिंकवरुन टास्क देऊन तरुणीला घातला सव्वा लाखांना गंडा

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंचा संयम सुटलाय, ते बावचळलेल्या अवस्थेत’, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News