भोसरी विधानसभेच्या जागेवर शिवसेनेनं केला ‘दावा’

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असताना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगितले. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे रहावा अशी विनंती पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे ही त्यांनी सांगितले. भोसरीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महेश लांडगे आमदार असून ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना आमचा विरोध नसल्याचे सांगत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे गेला तर आम्ही भाजपच्या उमेदवाराला मदत करू असे आढळराव पाटील यांनी सांगितले. तसेच या शिरुर लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मंगळवारी मातोश्रीवर मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भोसरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. या मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असून महेश लांडगे यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेकडून लढवावी, असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले आहे. भोसरी मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास शिवसेनेचा आमदार होईल. त्यासाठी मतदारसंघ भाजपला सोडू नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांच्याकडे केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like