‘महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा’, CM उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेना जिल्हाप्रखुमांसोबत काल रात्री उशीरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेली ही बैठक तब्बल 3 तास सुरू होती.

सीएम उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरंसच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी (District Head) संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालली. यावेळी दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार अभिनंदन केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं. सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे. मात्र लवकरच यावर तोडगा काढू” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इतकंच नाही तर कोव्हिड (Covid-19) काळात राज्य सरकारनं केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असंही सीएम ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपल्या भावना मांडल्या. यावेळी त्यांनी भाजपचा खसपूस समाचार घेतला. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांत सिंह प्रकरण, कंगना रणौतवरून निर्माण झालेला वादंग अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी आक्रमक शैलीत भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्रिपद स्विकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दसरा मेळावा होता.