शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आमदारांची यादी तयार, सत्तास्थापनेचा दावा करणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नाहीये. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र भाजपने आपण सत्तास्थापन करणारा नसल्याचे राज्यपालांना कळवल्यानंतर आता शिवसेनेला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या गोटातून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या असून दुसरीकडे त्यांना पाठिंबा द्यायचा कि नाही यासाठी आघाडीतील दोन्ही पक्षांची बैठक सुरु आहे.

या बैठकीनंतर दोन्ही पक्ष पाठिंबा द्यायचा कि नाही याची घोषणा करणार आहे, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार असून यासाठी यादी देखील तयार झाल्याची माहिती मिळत आहे. किती आमदार पाठिंबा देणार आहेत याची यादी देखील तिन्ही पक्षांनी तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या यादीनंतर आता तिन्ही पक्ष कधी सत्तास्थापनेचा दावा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज चार वाजता राज्यातील नेत्यांबरोबर बैठक होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याचे त्याची स्पष्ट केले.

Visit : Policenama.com