धक्कादायक ! शिवसेनेच्या नगरसेविकेनं आत्महत्येची धमकी देत भिंतीवर डोकं आपटलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत बुधवारी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारानंतर महापौरांनी सभाच स्थगित केली.

Image result for शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके

वॉर्डातील कामांचे बिल काढण्यासाठी टाळाटाळ तसेच उद्दामपणाची भाषा करणाऱ्या मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांच्याविरुद्ध आताच कारवाई करा, अन्यथा सभागृहातच आत्महत्या करीन, असा इशारा नगरसेविका मीना गायके यांनी दिला. त्यांनतर महापौरांनी सुरेश केंद्रे यांना सभागृहाबाहेर जाण्यासाठी सांगितले. केंद्रे सभागृहाबाहेर जाण्यासाठी निघाले असता संतापलेल्या नगरसेविका गायके यांनी त्यांचा रस्ता अडवून सभागृहाच्या भिंतीवर स्वत:चे डोके आपटले. त्यामुळे त्या चक्कर येऊन जागीच कोसळल्या.

मीना गायके यांच्या वॉर्डात ड्रेनेज लाइन, जलवाहिनी लाइन चोकअप असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी जात असल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. मात्र या कामासाठी ठेकेदाराला निम्मेच बिल चुकते करण्यात आल्यामुळे त्याने काम थांबले होते. दोन महिन्यांपूर्वी आयुक्तांनी या ठेकेदाराला पाच लाख रुपये उर्वरित काम करून घेण्यासाठी केंद्रे आणि पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले होते. मात्र केंद्रे यांनी बिल दिले नव्हते.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like