Video : शिवसेनेच्या नगरसेवकाकडून चिकन व्यापार्‍यास बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने चिकन व्यापार्‍यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नगरसेवक वैद्य यांनी मच्छीमार कॉलनी जवळ चिकन व्यापार्‍यास मारहाण केली. कोंबडयांनी भरलेल्या टेम्पोच्या पार्किंगवरून तसेच इतर काही गोष्टींवरून नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी चिकन व्यापार्‍याला मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.

माहीम रेल्वे स्टेशनजवळ चिकन व्यापार्‍याने कोंबडयांनी भरलेला टेम्पो पार्क केला होता. टेम्पोच्या ज्या ठिकाणी पार्क केला होता तेथून प्रचंड दुर्गंधी येत होती. वेळावेळी सांगितल्यानंतर देखील चिकन व्यापारी त्यांची वाहने तेथेच पार्क करीत होते. अखेर शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने चिकान व्यापार्‍यांना मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. मार बसल्यानंतर चिकन व्यापार्‍यांनी परिसरातून काढता पाय घेतला.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत