‘वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री यावरून शिवसैनिकांमध्ये असंतोष’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकारच्या सत्ता स्थापनेच्या जवळपास ३४ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, तिन्ही पक्षाच्या एकूण ३६ नेत्यांना मंत्रीपदी शपथ देण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचे सूर उमटू लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री यावरून शिवसैनिकांत असंतोष आहे, ‘असे भाष्य त्यांनी सिंधुदुर्गातील एक कार्यक्रमावेळी केले.

‘राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर कॅबिनेट मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी शपथ घेतली आहे. त्यावर अनेक जण नाराज आहेत. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार असं सांगणारे स्वत: मुख्यमंत्री झाले आणि मुलाला मंत्री बनवले. रस्त्यावरील शिवसैनिक बाहेर फेकला गेला आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. मात्र आम्ही कोणाशीही संपर्क साधला नाही. आम्हाला मोडतोड सरकार नको आहे’, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर तोफ लागली आहे.

दरेकर पुढे म्हणाले कि, ‘त्याचसोबत शिवसेनेला कोकणाने १५ आमदार निवडून दिलेत. मात्र शिवसेनेने केवळ एकमेव मंत्री कोकणाच्या वाट्याला दिला. शेवटी ठाकरे सरकारने कोकणावर अन्यायच केला आहे असा आरोपही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, प्रविण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्य शासनाने शासकीय निवासस्थान दरेकर यांना अ ९ हा बंगला दिला होता. मात्र, आज शासनाने परिपत्रक काढून दरेकरांचा अ ९ बंगला मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात दिला, आणि त्याऐवजी दरेकर यांना अवंती ८ हे शासकीय निवासस्थान दिल. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर निवासस्थान देण्यात आलं आहे. मात्र, राज्य सरकारने सूडाच्या भावनेने माझा बंगला बदलून दुसरं शासकीय निवासस्थान दिल, सरकारने माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/