भारत बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा नाही

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

इंधनदरवाढीच्या विरोधात काँग्रसह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंदच्या हाकेला मनसेनेही साथ दिली आहे. मात्र, काँग्रेसने पुकारलेल्या या बंदला शिवसेनेचा पाठिंबा दिला नाही. विरोधी पक्षाला उशिरा जाग आली आहे. आम्ही आधीपासून महागाई वाढल्याचे सांगत आलो आहोत. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B00YPBQMGG,B0759SGM63′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75c86419-b43a-11e8-8f89-5da848922aa8′]
काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. महागाई व इंधन दरवाढीविरोधात नेहमी केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारा भाजपाचा सहकारी पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना शिवसेना भारत बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.
[amazon_link asins=’B01GFPGHSM,B012AQIQ48′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8eb305a7-b43a-11e8-8ab6-5989a696d3e2′]
महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे आम्ही पूर्वीपासून सांगत आहोत. आम्हाला जनतेच्या भावना माहीत आहेत. आम्ही जनतेसोबतच आहाहोत असे सांगत विरोधकांनी महागाईविरोधात खुशाल आंदोलन करावे. जेव्हा ते अपयशी ठरतील तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे राऊत म्हणाले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

Please Subscribe Us On You Tube