विजय उत्सव साजरा झाला असेल तर अलीगढ प्रकरणात लक्ष घाला ; शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलीगढमध्ये एक लहान मुलीच्या झालेल्या हत्येच्या घटनेनंतर शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून भाजपची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लेखातून भाजपवर निशाणा साधताना विजय उत्सव साजरा करुन झाला असेल तर अलीगढ मधील दुदैवी घटनेकडे सरकारने लक्ष घालावे असे सांगण्यात आले आहे.

सामन्यातून सांगण्यात आले की, अलीगढच्या त्या घटनेनंतर समाज सुन्न झाला आहे. हे एक प्रकारचे बहिरेपण आहे कारण त्या लहान मुलीवर अत्याचार होत राहिला आहे. बेटी बचाओ चे नारे अशा वेळी व्यर्थ गेल्यासारखे वाटतात. अलीगढ मधील घटना मानवतेला कलंक आहे आणि समाजाची मान पुन्हा एकदा लाजेने झुकली आहे.

सामनातून म्हणण्यात आले की, पिडित मुलीच्या वडीलांनी शेजाऱ्यांला 10 हजार उसने दिले होते. पैसे परत मागण्यात आल्याची शिक्षा त्या अडीच वर्षाच्या लहानगीला सोसावी लागली. मुलीची क्रुरपणे हत्या करण्यात आली. या भीषण कृत्याला तर अमानवी शब्द देखील अपुरा पडेल. यावर आता सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी असे सामानाच्या लेखातून सांगण्यात आले आहे.

शिवसेनेने सामनातून सांगितले आहे की, उत्तरप्रदेशच्या अलीगढमध्ये फक्त 10 हजारासाठी एका अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपुर्ण देशातून क्रोध व्यक्त करण्यात येत आहे. काही लोकांनी मेणबती पेटवून दुख व्यक्त केले तर अक्षय कुमार, अनुपम खेर आणि इतर मंडळीनी घटनेच्या विरोधात क्रोध व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

बी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

बिहारमध्ये इन्सेफेलाइटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी