Shiv Sena | ‘धक्का बसलाय, काही सूचत नाही…’, शिंदे गटाला शिवसेना नाव-चिन्ह मिळाल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shiv Sena | कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर, महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) हादरवून सोडणारी घटना आज घडली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (Shiv Sena) नाव आणि चिन्हावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात वाद सुरु होता. अखेर यावर निवडणूक आयोगाने निर्णय झाला आहे.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मला नेहमी एक विश्वास होता की निवडणूक आयोग हे खरं पारदर्शक आहे. पण हा निर्णय म्हणजे मला कळतच नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आम्ही योग्य न्याय मागण्यासाठी निवडणूक आयोगाकडे नक्की जायला हवं. आम्ही कुठे कमी पडलो, हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

शिवसेनेची (Shiv Sena) स्थापना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केली आहे.
त्यांच्यानंतर शिवसेनेची कमान ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार. बाळासाहेब हयात असतानाच यावर निर्णय झाला होता.
राज ठाकरे (Raj Thackeray) ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला.
त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मला धक्का बसला आहे. त्यावर विश्वास बसत नाही.
आयोगाने हा निर्णय कोणत्या आधारे घेतला?असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Shiv Sena | eknath shinde faction gets shivsenas bow and arrow poll symbol orders by ec supriya sule reaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा