Shiv Sena | शिवसेना अन् धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री म्हणाले-‘अखेर…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हे चिन्ह एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना देण्यात आल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या निकालामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिली प्रतिक्रिया (Shiv Sena) दिली आहे.

 

अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांचा विचार आणि आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत एकरुप झालेले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा (Shiv Sena) हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

या देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या (Babasaheb Ambedkar) घटनेप्रमाणे कारभार चालतो.
आमचं सरकार घटनेच्या आधारावर स्थापन झालं. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय मेरिटवर दिला आहे.
हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते.
बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Web Title :- Shiv Sena | election commission verdict on shivsena cm eknath shinde first reaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा