भाजपला बाजूला ठेवायचं हे शिवसेनेनं आधीच ठरवलं होतं का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ मित्र किंवा शत्रू असत नाही असं म्हणतात. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या चालू असलेल्या घोळावरून सध्या असे चित्र निर्माण झाले आहे की शिवसेनेने यावेळी जाणीवपूर्वक भाजपला बाजुला सारले आहे. मात्र याची सुरुवात निवडणुकीपूर्वीच झाली होती का, अशी चर्चा सुरु आहे.

मागील पाच वर्षात सेना भाजपचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी झुरत ठेवलं तर सत्तेत असूनही शिवसेना भाजपवर टीका करताना दिसून आली.

विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. दरम्यान जागा वाटपात मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा मिळवलेला भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप बॅकफूटवर गेली. सेनेचा तो डाव यशस्वी झाला का, असा प्रश्न भाजपनेत्यांना पडला आहे.

Visit : Policenama.com