शिवसेनेने भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना लावलं पळायला

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील क्रिडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मैदानाची सद्यस्थिती खूप वाईट झाल्यामुळे माती उडत आहे. यामुळे तोंडावर रुमाल बांधून खेळाडूंना पळावे लागत आहे. यावर जाब विचारल्यानंतरही अधिकारी एेकत नसल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यालाच मैदानावर पळवल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुले उपाशीपोटी मैदानावरील धुळीत सराव करतात, हे कळल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संकुलात धाव घेतली. या प्रकरणाचा शिवसेनेने सतत पाठपुरावा केल्यानंतरही क्रीडा विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अनेकदा कार्यालयात जाऊन देखील क्रीडा संचालक राजकुमार महादवाड भेटले नाहीत. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.

तसेच विभागीय क्रीडा संकुलाच्या कँटिनमध्ये लावण्यात आलेल्या डायट चार्टनुसार जेवण दिले जात नसल्याचे समोर आले. भुसभुशीत झालेल्या मैदानावर अर्धपोटी खेळाडूंनी कसे पळावे हे दाखवा असे सांगत शिवसेनेने क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे आणि वॉर्डन सुनील वानखेडे यांना मैदानावर पळायला लावले