इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

लासलगाव – पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या दराच्या विरोधात लासलगाव येथे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करत यावेळी केंद्र सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दर कमी करण्याची मागणी केली असून या बाबतीचे निवेदन तलाठी नितीन केदार यांना देण्यात आले

अक्कड बक्कड बंबे बो अस्सी नब्बे पूरे सो म्हणण्याची वेळ आता पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे याकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन केले आहे लासलगाव बस स्थानकापासून ते मंडलाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी हात गाड्यावर गॅस टाकी,किटली ठेवण्यात आली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक देखावा घोडागाडी असलेल्या बगित हातात चहाची किटली धरून बसलेल्या शिवसैनिकाकडे या रॅलीदरम्यान सर्वांच्या नजरा लागलेला होत्या मंडल अधिकारी कार्यालय जवळ निवेदन देण्याच्या अगोदर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याची मागणी शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, पं सदस्य शिवा सुराशे, निवृत्ती जगताप,प्रमोद पाटील,उत्तम वाघ ,सोमनाथ गांगुर्डे,विकास रायते,राजाभाऊ दरेकर,विकास रायते,सोमनाथ गांगुर्डे,गुलाब तांबोळी,भगवान बोराडे,रविराज बोराडे,आनंद तुपके,उषा कुमावत,अश्‍विनी पाटील,शुभांगी बोराडे,योगिता खैरे,सुमन बोराडे अनिता रोटे,मनीषा पाटील,मिराबाई पाटील,बाळासाहेब जगताप,बाळासाहेब शिरसाट,पप्पू पंजाबी,अवतारसिंग गील ,लियाकत तांबोळी,राकेश ठाकरे आदी उपस्थित होते.