अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या नेतृत्वाखालील  सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे. या अविश्वास ठरावावर शिवसेना तटस्थ राहणार असल्याची माहिती खासदार व शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B01GA8IN7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’926d6221-8bdf-11e8-ba21-d192b7d72565′]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संसदीय बैठकीत निरोप पाठविला व तटस्थ राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना आज सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारकडे लोकसभेत आवश्यक संख्याबळ असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याची शक्यता नाही. मात्र या ठरावादरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारवर तुटून पडणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गेल्या चार वषार्तील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा लोकसभा आणि जनतेसमोर मांडतील.

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी कमी वेळ मिळाल्याने काँग्रेसची नाराजी आहे. केंद्र  सरकारचे अपयश आणि  १३० कोटी जनतेच्या समस्या अधोरेखीत करण्यासाठी हीच योग्य वेळ. त्यासाठी अविश्वास प्रस्तावावरील चचेर्साठी प्रत्येक पक्षाला किमान ३० मिनिटांचा वेळ मिळायला हवा होता. सर्वात मोठ्या विरोधी पक्षास केवळ ३८ मिनिटांचा वेळ मिळणे चुकीचे आहे़