ज्यानं मित्र समजत होतो तेच शत्रू निघाले !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बंद होण्याची काही चिन्हे दिसत नाही. आता पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनिशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले ही मंडळी इतक्या खालच्या थराला जातील असा विचार मी कधीही केला नव्हता. आम्ही कधीही अशा प्रकारच्या टीका केली नाही. पण ठीक आहे. जनता सगळं पाहतेय, असं ते म्हणाले आदित्य ठाकरेंना यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये तुम्ही ज्यांच्यासोबत इतकी वर्षे एकत्र काम केलं, सरकार चालवलं, तेच आज तुमच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. ते आधीचं नातं संपलंय का? शिवसेना पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही का? राजकारणात कधीही कोणतंही वळण येऊ शकतं. तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं का? आदी प्रश्नच यामध्ये समावेश होता.

या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य म्हणाले,आम्ही कधीही कोणाशीही शत्रुत्व पत्करलं नाही. कोणाशीही वैयक्तिक वैर पत्करून बदल्याच्या भावनेनं राजकारण केलं नाही. आम्ही कधीही वैयक्तिक टीका केली नाही. ज्यांना आम्ही मित्र समजत होतो ते आम्हाला शत्रू समजू लागले आणि जे शत्रू होते त्यांनी आम्हाला मैत्रीचा हात दिला. त्यामुळे आता समीकरणे बदलली आहेत. आम्ही राज्य आणि देशाच्या कल्याणासाठी चांगलं काम करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पीडीपी, जदयूसोबत युती करता, तेव्हा हिंदुत्व कुठे जातं?
शिवसेनेला नेहमीच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडलं जात. त्यावरही आदित्य यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले भाजप जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत तर बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत हातमिळवणी करू शकतो. भाजप अशा पक्षांसोबत युती करतो तेव्हा हिंदुत्व जात कुठे आणि दुसऱ्यांना हिंदुत्वाबद्दल प्रमाणपत्र देतो. शिवसेनेत भावनेला महत्त्व आहे आणि प्रत्येक शिवसैनिक आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.