Aditya Thackeray | मुंबईत लोकल सेवा पुन्हा केव्हा सुरू होणार? मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) ने आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray) म्हणाले की, आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स आदी 3 गोष्टींवर लक्ष दिले आहे, तसेच त्यांनी यावेळी मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनसंदर्भातही भाष्य केले आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत आम्ही आता निर्णय घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी, आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे लागेल. यासंदर्भात ज्यावेळी मेडिकल टास्क फोर्स सांगेल, त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार आहे का? राज्यात कशी तयारी सुरू आहे? असा प्रश्न एका वृत्तवाहिनेने आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात आम्ही लोकांकडून फिडबॅकदेखील घेत आहोत. मात्र, आता कोरोना लाट संपली असे समजू नका. भलेही आंकडे कमी झाले असतील, मात्र, दुसरी लाट संपली नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी आपल्याला अन् जगाला अद्याप आणखी वेळ लागणार आहे लॉकडाउनपासून आम्ही बिगीन अगेनकडे वाटचाल करत आहोत. मात्र, अशात लोकांनी मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे गरजेचे आहे. कारण याच गोष्टी आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात. लसीकरणही सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही सुरक्षित राहणे आवश्यक आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात ठाकरे म्हणाले, यासाठी आम्ही कॉर्पोरेट रिस्पॉन्स, मेडिकल रिस्पॉन्स आणि सिविक रिस्पॉन्स, या तीन गोष्टींवर लक्ष दिले आहे. मेडिकल रिस्पॉन्समध्ये आम्ही बेड्सची संख्या वाढवत आहोत. औषधी, लशी आणि आयसीयू वाढवत आहोत. मुलांसाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात टास्क फोर्स तयार केला आहे. कॉर्पोरेट रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास त्यांनी बरीच मदत केली आहे. मात्र, आता स्वतःच्या जबाबदारीकडेही पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्याला कोरोना झाल्यास कसा सामना करावा. सिविक रिस्पॉन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, अनलॉक कसे होईल, दुकानं कशी उघडली जातील. य सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देत असल्याचे ते म्हणाले.

हे देखील वाचा

Executive Engineer Trainee | इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 280 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास

सुंदर, चिरतरुण राहण्यासाठी मुलींनी रात्री घ्यावी ‘ही’ काळजी

 

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा