रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने उडवली खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थिती राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दात परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना हिनं काल राज्यपालांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी कंगनाला कडक शब्दात सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं रहावं. कंगनानं आपल्या बोरा बिस्तरा गुंडाळावा, मुंबई बद्दल वाईट बोलेलं आम्ही खपवून घेणार नाही. कंगनाने आपलं बस्तान उचलावं हेच योग्य ठरेल, अशा शब्दात परब यांनी इशारा दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगना मुंबईत आल्यानंतर तिची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, नंतर त्यांनी महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. रामदास आठवले यांच्या या मागणिने अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.

काय म्हणाले होते आठवले ?
कंगना राणौत आणि शिवसेना वादात चांगलाच पेटला असताना रामदास आठवले यांनी यामध्ये उडी घेतली. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष कंगनाला सुरक्षा देईल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं. एवढेच नाही तर कंगना मुंबईत आल्यानंतर तिची भेट घेतली होती.