शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना ‘कोरोना’ची लागण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेना नेते (Shivsena leader) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खैरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनच ही माहिती देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांचे पुतणे माजी नगरसेवक सचिन खैरे यांनी दिली आहे.

चंद्रकांत खैरे यांना काल रात्री अचानक अस्वस्थपणा जाणवू लागला होता. त्यानंतर आज दुपारी त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह (positive) आली. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझी आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, कृपया मझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल. खैरे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समृद्धी महामार्ग पाहणी दौऱ्यात सहभागी होते.