शिवसेना सत्तेपासून केवळ एक ‘पाऊल’ दूर, भाजपाशिवाय सरकार स्थापन करण्याचा ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री पदावरुन भाजप शिवसेनेत जुंपली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला चुचकारले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी त्यांनाच आहे. जर भाजपला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आहेत असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकीचे निकाल तर समोर आले परंतू अजून सत्ता कोण स्थापन करतंय हेच स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे तर भाजप मात्र मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. यामुळे हा तिढा कसा सूटणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे म्हणत शिवसेनेची बाजू उचलून धरणाऱ्या संजय राऊतांना आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.

भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते सोबत घेतले तरीही त्यांचे 105 आमदारच निवडून आले. सभागृहात 145 चा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपकडे ईडी आहे. आज ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहे. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे.

संजय राऊत सत्ता स्थापनेचा दावा करत म्हणाले की, भाजपला सरकार स्थापन करणे जमले नाही तर शिवसेना 145 चा जादूई आकडा सिद्ध करुन दाखवेल. शिवसेना सरकार बनवू शकते. सरकार बनवण्याची आमची पूर्ण तयारी झाली आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र देखील आमच्याकडे आहेत. भाजप सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेऊ आणि पाठिंब्याची पत्र दाखवू.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की राज्यात सरकार स्थापन करण्याच्या मार्गांची चाचपणी करण्याचे पूर्ण अधिकार राज्यपालांना आहेत. आतापर्यंत सत्तास्थापनेविषयी राज्यपालांनी हालचाली करायला हव्या होत्या. त्या होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला काळजी वाटते.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या