भाजपा आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये काय आहे फरक ? आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझ हिंदुत्व असल्याचे शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर भाजपाचे हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचे हिंदुत्व ? त्यांचे एका राज्यात वेगळ हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळे हिदुत्व असते. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

नुकतेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. तसेच अनेकदा विरोधकांकडून शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही टीका झाली. या पार्श्वभूमीवर तसेच वर्षपूर्तीनिमित्त एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे.

आरोपाचेही दिले स्पष्टीकरण
गेल्या एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, अनेक आरोप झाले असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेले नाही. महाविकास आघाडी चांगल काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.