लाज वाटते ! ‘सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडीओचा भारतात मोठा व्यापार’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडीओचा मोठा व्यापार भारतात होत आहे. त्यामुळेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवेदन दिल्याचे शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सांगितलं आहे.

कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात 6 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कळमेश्वर बंदची हाक दिली आहे. चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या, फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा (हैद्राबादमध्ये) अशा मागणीनं जोर धरला असताना नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “सर्व द्रुतगती मार्गांवर ऑनलाईन देखरेख झाली पाहिजे. एखाद्या रस्त्यावर मुलीची छेडछाड होत आहे असे दिसले तर लगेच तिला मदत मिळायला हवी. अत्याचाऱ्याच्या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. त्यातच फाशीची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या मुली अशा घटनांनंतर बचावतात त्यांना साक्षीदार संरक्षण काद्यांतर्गत संरक्षण द्यायला हवे. उन्नावसारखी घटना महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी घ्यायला हवा.”

पुढे नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “नागपूर पोलीस निरीक्षकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टीनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या मुली प्रतिकार करू शकत नाही अशा मुलींवर अत्याचार आणि त्यांची हत्या केल्याच्या घटना राज्यात वाढताना दिसत आहेत. वाशिमलाही अशीच एक घटना घडली आहे.”

Visit : Policenama.com

You might also like