शिवसेनेचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांसाठी भरवणारा ‘अजान स्पर्धा’

पोलिसनामा ऑनलाइन – महाआघाडी सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाने वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निशाणा साधला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांपासून राज्यातील प्रार्थनास्थळ बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपनं लक्ष केलं होतं. परंतु, आता पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.

बसीरत ऑनलाइनशी संवाद साधताना पांडुरंग सपकाळ यांनी या स्पर्धेची माहिती दिली. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. “अजान मध्ये फार गोडवा आहे. ती एकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल असं मनाला वाटत राहतं.” आहे शब्दात सकपाळ यांनी अजानचं कौतुक केले आहे. त्याबद्दल त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न सपकाळ यांना विचारण्यात आला. त्यावर सगळे धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे आवाजाबद्दल अडचण वाटण्याचं काहीच कारण नाही. अशांकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं सकपाळ म्हणाले. मानवतेच्या दृष्टीने समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत. अधिक माहिती देताना सपकाळ यांनी सांगितले, की शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटात अजान संपवतात्. कशा प्रकारे म्हणतात याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीस दिले जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल.

You might also like