शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना जीवे मारण्याची धमकी,FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर धमकी देणाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंद करण्यात आली आहे.आशिष नावाच्या या ट्विटर युझरने प्रियांका चतुर्वेदी आणि शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याविषयी अभद्र शब्दाचा वापर करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविषयी प्रियंका यांनी आरोपीचे ट्विट शेअर केले असून त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, विरोध सहन करू शकते, मात्र धमकी नाही. त्यानंतर दोघीनींही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रियांका यांनी पोलिसांचे आणि शिवसेना नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Visit : Policenama.com