चंद्रकांतदादा ‘पेंटर’ तर शिवसेना ‘कारपेंटर’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीतील दोन्ही पक्ष जागावाटपांवरून भांडत असताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 2014 मध्ये जिंकलेल्या जागा कायम ठेवत युतीमधलं जागावाटप होईल, असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत टोला हाणला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, जागावाटपाचं चित्रं रंगवणारे ते पेंटर असतील तर आम्ही कापायचं काम करणारे कारपेंटर आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावे असा टोला त्यांनी भाजपला लगावला. यामुळे आता जागावाटपात ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले कि, जर ते म्हणाले असतील कि 300 टक्के युती होणार तर मी म्हणतो कि, 550 टक्के युती होणार. त्याचबरोबर जागावाटपावर भाष्य करताना ते म्हणाले कि, आधी ठरल्याप्रमाणेच जागावाटप होईल तसेच मुंबईत कोणता आकडा आणायचा आहे तो आम्ही आणूच असा इशारा देखील त्यांनी नाव न घेता दिला.

दरम्यान, विविध पक्षातील नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी बोलताना ते म्हणाले कि, अनेकांना शिवसेनेचे विचार पटत आहेत त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आणि कार्यपद्धती त्यांना पटत असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर भाजप तुम्हाला 144 जागा देणार का यावर बोलताना ते म्हणाले कि, माध्यमांनी चुकीची चित्रे रंगवू नयेत. त्यामुळे शिवसेना मानाच्या स्थानावर असून जागावाटपात देखील आम्ही मानाचे स्थान पटकावणार आहोत.

आरोग्यविषयक वृत्त –