Sanjay Raut : भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण…? सरकारने अशावर कारवाई करावी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा फडकावणे ही महाराष्ट्राची शान, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेक दिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची अन् हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी केला आहे. सरकारने अशा घुबडांची काळजी न करता कठोर कारवाई करावी. तसेच स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही. कारण भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असेही राऊत sanjay raut म्हणाले.

महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. तसेच भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ असे म्हटले होते. यासंदर्भात राऊत sanjay raut यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. अनेक क्रांतीकारक या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. त्यांच्या पाठीशी या भगव्या ध्वजाची आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती. हे जर कुणाला कळत नसेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असेही राऊत sanjay raut यांनी म्हटले आहे.

Also Read This : 

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फसव्या बिल्डरांना चाप, वेळेवर घर दिले नाही तर व्याजासह द्यावी लागेल संपूर्ण रक्कम

लस घेण्यासाठी कोणती चांगली वेळ ‘सकाळ’ की ‘रात्र’?, जाणून घ्या

भल्या पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले – ‘ती एक चूक होती, पण पश्चाताप होत नाही’