Sanjay Raut : ’12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना आज वाढदिवस दिनानिमित्त एका अनोख्या पद्धतीने जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा’, विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’. अशा अनोख्या शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Birthday to the Governor in a unique way given by Sanjay Raut)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

राज्यपाल (Governor)आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यामध्ये वारंवार संघर्ष सुरु असतो.
असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सकाळीच राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केलं.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा, विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी.
बाकी लोभ आहेच.
तो तसाच राहील. जय महाराष्ट्र, असे राऊत म्हणाले.

मागील 8 महिन्यापासून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष सुरूच आहे.
यामध्येच आता 12 आमदारांची यादी ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मधील काळात राजभवनाकडे ही यादीच उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं.
परंतु, ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडेच असल्याची माहिती आता समोर आलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती.
ती यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांना दिली होती.
त्यानंतर मंगळवारी (15 जून) रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान याचिकांवर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title : shiv sena leader sanjay raut gave greetings governor bhagat singh koshyari different way twitter

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update