आम्ही शरद पवार यांची मुलाखत घेतलीय, तुम्हीही घेऊन दाखवा : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली मुलाखत घेतली आहे. मात्र, याबाबत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी हि मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ आहे, असे म्हंटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेऊन तुमचीही वृत्तपत्रे आहेत. त्यामुळे शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत घ्यावी. बघूया, शरद पवार तुम्हाला मुलाखत देतात की नाही? आणि ती मुलाखत छापण्याची हिंमत दाखवणार का?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ‘सामना’मध्ये मुलाखत आहे. दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या मुलाखती लवकरच घेणार आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘नया है वह’ या विधानावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस देखील नवीन आहेत. तसेच तरुणांना संधी द्या, या मताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री अमित शहा देखील आहेत. मोदी आणि शहा देखील दिल्लीच्या राजकारणात नवीन आहे. त्यांनी दिल्लीत उत्तम काम केले आहे. मात्र, त्यांना आम्ही कधी ‘नया है वह’ असे म्हटले का ? असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.

आम्ही फोन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि जिल्हानिहाय बैठकांद्वारे लोकांची मदत कशी करता येईल?, यावर लक्ष केंद्रित करत आहे. विरोधी पक्षातील काही मंडळी ही हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत आहेत, अशी असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. यानंतर मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटते त्यांना ते मंत्री करु शकतात. पण, मंत्री झाल्याने शहाणपण येतच असे नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच ‘नया है वह’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला मारला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like