संजय राऊतांचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज पुणे येथे लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात मुलाखतीदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत होते. या दरम्यान संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या, असे वादग्रस्त विधान त्यांनी या दरम्यान केले.

संजय राऊत म्हणाले की, मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे, दाऊद बरोबर बोललो आहे आणि एवढेच नाही तर दाऊदला दम सुद्धा दिला आहे, असा दावा संजय राऊतांनी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ते पुढे म्हणाले तेव्हाच काळ हा खूप वेगळा होता, आताची परिस्थिती फार वेगळी आहे. तेव्हा मोठमोठी गुंड ही मुंबईत राहून सत्तेच्या चाव्या फिरवत होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असे संजय राऊत यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.

आज पुण्यात दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे वितरण संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार आणि लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा देखील उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/