भाजपची डोकेदुखी वाढणार ! ‘शिवसेने’कडे बहुमताची यादी तयार, ‘या’ बड्या नेत्याची ‘डरकाळी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री करण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपचे टेंशन वाढले आहे. भाजपमध्ये धमक असेल तर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचे ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही जास्तीचे मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्याची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले असल्याचे संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवंच अशी शिवसेनेची भूमिका असल्याने सत्तास्थापनेचा गाडा ‘वाटणी’च्या रस्सीखेचात फसला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रीपदावरुनच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिले नाही. चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरयाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही ? असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या