Shiv Sena leader Yashwant Jadhav | आयकर विभागाची मोठी कारवाई ! शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shiv Sena leader Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्या 41 मालमत्ता जप्त (Property Seized) करण्यात आल्या आहेत. यामध्ये भायखळ्यातील (Byculla) 31 फ्लॅट्स आणि 5 कोटी रुपयांचा वांद्रे (Bandra) येथील प्लॅटचा समावेश आहे. आतापर्यंतची ही आयकर विभागाकडून (Income Tax Department) मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेला (Shiv Sena) आणखी एक धक्का बसला आहे.

 

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने भायखळ्यातील बिलखाडी चेम्बर्स (Bilkhadi Chambers) या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर विभागाच्या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

 

 

सुत्रांच्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांनी उदय महावारच्या (Uday Mahawar) प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला (Pradhan Dealers Pvt. Ltd.) 15 कोटी रुपये रोख दिले. हे 15 कोटी रुपये महावारने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 6 कंपन्यांमध्ये कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखवत वळते केले. त्यानंतर जाधव यांना प्रधान डीलर्स कंपनीची मालकी देण्यात आली आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्या आधारेच गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार करण्यात आली.

 

दरम्यान, सन 2018 ते 2022 मध्ये जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना
त्यांनी या मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे.
त्याचबरोबर, आयकर विभागाने यशवंत जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते (Vilas Mohite) आणि
पुतण्या विनीत जाधव (Vineet Jadhav) यांना समन्स बजावले आहेत. दरम्यान, त्याचे स्टेटमेंटही रेकॉर्ड केलं आहे.

 

Web Title :- Shiv Sena leader Yashwant Jadhav | mumbai it department attaches yashwant jadhavs rs 5 crore flat in bandra and 40 other properties

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा