शिवसेना नेत्याच्या गाडीला भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ झाला. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जात होते. अपघातात दिलीप माने किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त असून त्यांचे कुटुंबीय सुखरुप आहेत.

म्हसवड येथील सिद्धनाथ दर्शनासाठी माने कुटुंबीय इनोव्हा कारमधून जात होते. तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाला इनोव्हाची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. तर दुचाकीस्वार हा लांब फेकला गेला. या अपघातात दुचाकीवरील शहाजी राऊत (वय-55) यांचा मृत्यू झाला आहे. तर दिलीप माने यांना किरकोळ मार लागला असून त्यांचे कुटुंबीय सुखरुप आहेत.

अपघाताची माहिती मिळताच माळशिरस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातामुळे मर्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर दिलीप माने यांच्यावर प्रथमिक उपचार करण्यात आले असून ते पुन्हा सोलापूरच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like