अखेर 4 महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. मात्र आज तीनही पक्षांच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खातेवाटपचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंत्रीपदाच्या वाटपाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अशातच आता महाविकासआघाडीनं चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न मार्गी लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकमत झालेले नव्हते. अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे तर गृहनिर्माण आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या सगळ्यात काँग्रेसला अद्याप कोणतंही खातं देण्यात आल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे आता काँग्रेसला नेमकं कोणतं मंत्रीपद दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांना खातेवाटप झाले नव्हते. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांना खाते वाटप करण्यात येणार आहे. जेणे करून हे मंत्री अधिवेशनामध्ये त्यांच्या खात्याच्या बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील. दरम्यान, गृह खाते राष्ट्रवादी आपल्याकडे घेणार असून हे खाते अजित पावार यांना मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत गृह खाते शिवसेनेकडे गेल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Visit : Policenama.com

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे