‘असं काम तुमच्या बापानं केलं होतं का ?’, मंत्री अब्दुल सत्तारांनी भर सभेत अधिकाऱ्यांना झापलं (व्हिडीओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीचा प्रताप पाहून शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी भर सभेत अधिकाऱ्यांना फैलावर घेत झापल्याचं पहायला मिळालं.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढाव घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी बैठक बोलवली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरसभेत झापलं.

 

 

 

 

अब्दुल सत्तार म्हणाले, फुटकचाच पगार घेता का. असं काम तुमच्या बापानं केलं होतं का. दलालाकडून पैसे मिळाले, तर तुम्ही खुश असतात. जेव्हा सर्वसामान्य माणसाचं काम असतं तेव्हा कुठं असता, अशी यादी तयार कली जाते का. महाराष्ट्र कुठं आहे हे तरी माहित आहे का. एखाद्या राक्षसाची अवलादही अशी वागणार नाही. गरीबांना न्याय देण्याची भूमिका पाहिजे. गरीबांना घरकुल दिलं पाहिजे असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्याची कानउघडणी केली.

पुढं बोलताना ते म्हणाले, ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं त्यांचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. सरकारी योजना या त्यांच्यासाठीच आहेत. सर्वसामान्य नागरिक हे आमचे मालक आहेत. ते आमचा कान धरू शकतात. जर एक रुपयांचा पैसा खाल्ला तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.