कॅबिनेट मंत्री अनिल परब लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, CM उद्धव ठाकरेंनी रद्द केली बैठक !

पोलिसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आज सकाळी अनिल परब यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यांना तातडीनं लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या स्थितीत अनिल परब सर्व खबदारी घेत आपले कार्य पार पाडत होते. याच भेटी गाठी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळं आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन परब यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली होती. मात्र अनिल परब यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केली आहे.

‘या’ 9 मंत्र्यांनी केली ‘कोरोना’वर मात

आतापर्यंत राज्यातील जवळपास 9 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 तर एका अपक्ष मंत्र्याला कोरोना झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु या सर्वांनी कोरोनावर मात केली असून ते सध्या मंत्रिमंडळात काम करत आहेत.