शिवसेना आमदाराची जीभ घसरली; आणखी एक नवा वादग्रस्त Video व्हायरल

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे कोरोनाने हाहाकार केला असून दुसरीकडे केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर आणखी एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली असल्याचं व्हीडीवरून समोर आलं आहे.

संजय गायकवाड यांनी फडणवीस यांच्या तोंडात कोरोना जंतू कोंबण्याची भाषा केली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाष्य केलं असून भाजपच्या एका माजी मंत्र्यासाठी चक्क शिवराळ भाषा केली आहे. शिवसेना आमदार गायकवाड यांनी एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित करत. त्या वक्तव्यात त्यांनी भाजप नेते संजय कुटे यांच्यासह बुलडाण्यातील इतर भाजप नेत्यांवर कलुषित टीकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी अनेक असंसदीय शब्दांचाही वापर केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच जर अशा भाषेचा वापर करत असतील तर कायदा-सुव्यस्थेचं काय, असा सवाल उपस्थित ळोत आहे. गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत व्हायरल केला आहे.

गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका –
गायकवाड म्हणाले होते की, तुमच्या सरकारमुळं लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते डणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते, असे ते म्हणाले होते. तसेच गायकवाड यांनी केलेल्या तीव्र वक्तव्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार का किंवा त्यांना समज देणार का,? असा प्रश्न उपस्थित होत आहे.