शिवसेना आमदार आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सह्याद्री अतिथीगृहात जाण्यास रोखल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारावर वैभव नाईक यांना पोलिसांनी आडवल्याने ते संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना न जुमानता ते सह्याद्री अतिथीगृहात गेले. कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार आज समोर आला आहे.

सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक सुरु असल्यानं पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना आत जाण्यास मज्जाव केला. मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आत सोडल्यानं नाईकांना संताप अनावर झाला आणि त्यानी पोलिसांशी बाचाबाची केली.
विनायक मेटे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्यानं त्यांची गाडी आत सोडण्यात आली असल्याचं पोलिसांनी नाईकांना सांगितलं. मात्र, तरी देखील नाईक शांत झाले नाही आणि त्यांनी पोलिसांना न जुमानता सह्याद्री अतिगृहात प्रवेश केला. घडलेल्या प्रकारामुळे गेटवर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

२० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात