शिवसेनेचा आणखी एक आमदार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला हलवलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशातच लोकप्रतिनिधी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाशिक विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार दराडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, त्यांच्या पत्नी सुरेखा गडाख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाईन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी दिवसभरात 311 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात पाच हजार 722 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 3792 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिकमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 205 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात 322 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.