शिवसेना आमदारांना ‘रंगशारदा’ येथून हलवणार, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरुन सावध पवित्रा घेत शिवसेना आमदार थांबलेले हॉटेल रंग शारदा मधून हलवण्यात येणार आहे. रंग शारदा हॉटेल परिसरात दोन बस दाखल झाल्यानंतर या संबंधित चर्चा सुरु झाली होती. अखेर शिवसेना आपल्या आमदारांना मलाडच्या रिट्रिट हॉटेलमध्ये हलवणार आहेत. राज्यातील सर्व आमदार मुंबईच्या रंग शारदा हॉटेलमध्ये जमले होते, परंतू व्यवस्थापनाचा अडचणी आणि कमी जागा असल्याने जमलेल्या आमदारांना शिवसेनेला रिट्रिट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.

दरम्यान शिवसेना सचिव संजय नार्वेकर यांनी पोलिसांना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. हे पत्र शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षा देण्यात यावी यासाठी आहे. या पत्रात 8 ते 15 तारखेपर्यंत सर्व आमदारांना सुरक्षा देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे सावध पवित्रा म्हणून सर्वच पक्ष आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतल्यानंतर काँग्रेसकडून देखील आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे.

परंतू सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की काँग्रेसकडून करण्यात आलेला दावा खोटा आहे. भाजपकडून कोणत्याही पक्षाच्या आमदारांना फोन करण्यात आलेला नाही, काँग्रेस नेत्यांकडे तसा पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा अन्यथा जनतेची माफी मागावी.

संख्याबळ जमावण्यासाठी भाजप शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले होते, पहिल्यांना आमदारांच्या राहण्याची सोय रंग शारदा या हॉटेलमध्ये करण्यात आली होती, परंतू आता त्यांना रिट्रिट या हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे.

Visit : Policenama.com