कंगनाच्या कार्यालयावर ‘हातोडा’ : शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये लिहीलं – ‘उखाड दिया’

मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने बुलडोजर चालवल्यानंतर आज शिवसेनेचे मुख्यपत्र सामनाने ’उखाड दिया’ च्या हेडिंगने आपली लीड स्टोरी केली आहे. या वृत्तपत्राच्या हेडिंगमध्ये बोल्ड अक्षरात लिहिले आहे ’उखाड दिया’. बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने अभिनेत्री कंगना राणावतच्या बांद्रा येथील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडला. नंतर मुंबई हायकोर्टने या प्रक्रियेवर स्टे ऑर्डर दिली. परंतु, तोपर्यंत बीएमसीने कंगनाच्या बंगल्याचा अनधिकृत भाग बहुतांश पाडून टाकला होता.

हिमाचल प्रदेशहून मुंबईत पोहचल्यानंतर कंगनाने ट्विट करत आणि व्हिडिओद्वारे शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. तिने आपला बंगला “राम मंदिर” आणि स्वता छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी असल्याचे म्हटले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारा एक व्हिडिओ संदेश तिने पोस्ट केला आहे. यामध्ये कंगना म्हणते, ‘उद्धव ठाकरे, तुला काय वाटते, कि तू फिल्म माफियांसोबत मिळून माझे घर तोडून माझ्याशी मोठा बदला घेतला आहे. आज माझं घर तोडलं आहे, उद्या तुझी घमेंड तुटेल, हा काळ आहे, लक्षात ठेव नेहमी एकसारखा नसतो.’