छगन भूजबळांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर ‘फुलस्टॉप’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाई – नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रेवश देयचा किंवा नाही हा भाजपचा विषय आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. संजय राऊत येवला येथे बोलत होते. यावेळी त्यांनी राणे यांच्या प्रवेशावर मत व्यक्त करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच राणे यांच्या भाजप प्रवेशाला आणचा विरोध नसल्याचे सांगितले.

येवला मतदारसंघातील शिवसेनेच्या कर्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खसदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी मागणी राऊत यांच्यकडे केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नसल्याचे आश्वासन कार्य़कर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बरा असल्याचे छगन भुजबळ यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते.

शिवसेनेमध्ये मुलाखती होत नसून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फक्त बैठका घेतल्या जात आहेत. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. सध्या राजकारणाचे केंद्रबिंदू उत्तर महाराष्ट्र असल्याने, उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखूनच नत्यांना पक्षात प्रवेश देतो असे सांगत त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like