पक्क ठरलं ! शिवसेनेकडून ‘हे’ खासदार घेणार ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाची शपथ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मित्रपक्षांच्या एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार आहे. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खासदार अरविंद सावंत यांचे नाव सुचवले आहे. यामुळे सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशा चर्चा होत्या. त्यात अरविंद सावंत, संजय राऊत आणि गजानन किर्तीकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, सध्या फक्त एका नावाची वर्णी लागली आहे. पुढील काळात किती मंत्रीपदे मिळतात हे समजेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. त्यांनी करत आम्ही पाहत राहू, असंही त्यांनी म्हटलं.

शिवसेनेत अरविंद सावंत यांच्या नावावरून शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. त्यावरही त्यांनी खुलासा केला. सावंत यांच्या नावामुळे शिलवसेनेत नाराजी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच राऊतांनी यावेळी एक महत्त्वाचे आणि एक सुचक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास आपण मंत्रिपदाची शपथ घेऊ असं सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या शिवसेनेच्या वाट्याला दोन राज्यमंत्रीपदे येणार आहेत. त्यात शिवसेनेतील एकमेव महिला खासदार भावना गवळी (यवतमाळ), बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची नावे समोर येत आहेत.