शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लावला ‘आयुर्वेदिक कोंबडी’ आणि ‘आयुर्वेदिक अंड्याचा’ शोध !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत आयुर्वेद, योग, प्राकृतिक चिकित्सा या विषयावर जोरात चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील सहभागी झाले. संजय राऊत यांनी या चर्चेत आयुर्वेदिक कोंबडी आणि आयुर्वेदिक अंडे या संबंधी चर्चा छेडली. आयुर्वेद हा भारताच्या प्राचीन परंपरेचा भाग आहे, असे राऊत म्हणाले.

राऊत यांनी सांगितले की, नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात गेल्यावर मला जेवणासाठी चिकन देण्यात आले. राऊत यांनी चिकन खाण्यास नकार दिला. तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की, ही आयुर्वेदिक कोंबडी आहे. आदिवासींनी राऊत यांना सांगितले की, या आयुर्वेदिक कोंबडीचे चिकन खाल्ल्यामुळे शरीराला कोणेताही रोग होत नाही. संजय राऊत यांनी यासंबंधी संशोधन करायला सांगितले.

आयुर्वेदिक अंड्याचा शोध

राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी सांगितले की, हरियाणातील चौधरी चरण सिंह कृषी संस्थेमध्ये आयुर्वेदिक अंड्यावर संशोधन केले जात आहे. या संस्थेचे काही लोक राऊत यांना भेटायला आले, त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत यांनी सांगितले की, ज्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांचे पोषण केले जाते त्या पोल्ट्रीत कोंबड्यांना फक्त हर्बल (लवंग, तीळ) खाऊ घातले जाते. त्यापासून जे अंडे तयार होते ते पूर्णपणे आयुर्वेदिक असते. मांसाहाराचे सेवन करणारे सुद्धा याचा वापर करून प्रोटीनची कमतरता भरून काढू शकतात. राऊत यांनी सांगितले की, आयुष मंत्रालयाने याला सर्टीफाइड केले पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा