छातीत दुखत असल्यानं शिवसेनेचे खा. संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे नेते आणि खा. संजय राऊत हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत यांनी लिलावतीमधील डॉक्टरांची वेळ घेतली होती. आगामी 2 दिवस संजय राऊत हे लिलावती रूग्णालयात उपचार घेणार आहेत. गेल्या दोन आठवडयापासुन राऊतांची प्रंचड धावपळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर आता उपचार करण्यात येणार आहेत.

संजय राऊत यांनी लिलावतीमधील डॉक्टरांची वेळ घेतली होती. डॉक्टर राऊतांवर उपचार करणार असून आगामी 2 दिवस ते लिलावती रूग्णालयात राहणार आहेत. त्यामुळे फायरब्रॅन्ड राऊतांची भुमिका कोण निभावणार हे पहाव लागणार आहे. रूग्णालयाच्या 11 व्या मजल्यावर त्यांना अ‍ॅडमीट करण्यात येणार आहे. 2 दिवस राऊतांना सक्तीचा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन तणावात असल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, लिलावतीच्या डॉक्टरांनी राऊत यांची प्रकृती व्यवस्थित असून काही एक घाबरण्यासारखं नाही असं सांगितलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की रूटीन चेकअपसाठी संजय राऊतांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज रात्री चेकअप करण्यात येईल आणि उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल असं मला वाटतं असे सुनील राऊत यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like