‘मी पुन्हा येईन’ असं आम्ही म्हणणार नाही’, संजय राऊतांचा फडणवीस यांना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही पुढील पाच वर्षे काय घेऊन बसलात. पुढची 25 वर्षे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारखं मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असे म्हणणार नाही. तसेच ये-जा देखील करणार नाही. कायम सत्तेत राहू असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला, यावर उत्तर देताना राऊत बोलत होते.

राज्याच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच काँग्रेसच्याही नेत्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राला आम्हाला पुढे न्यायचे आहे. राज्यात आत्तापर्यंत अनेक पक्षांचे सरकार होते. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्य़क्रम ठरवला आहे. सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना पक्षप्रमुख ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही पक्ष एकत्र येऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यांचेच भलं आहे, असेही ते म्हणाले.

आम्हाला ओला दुष्काळ, पायभूत सुविधा अशा बाबींवर अजून काम करावे लागणार आहे. आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते. ज्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाचेच येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलणार नसल्याचे राऊत यांनी भाजपला ठणकावले.

Visit : Policenama.com