CM उद्धव ठाकरे – संजय राऊतांमध्ये ‘अंतर’ ?, Facebook वरील पोस्टमुळं चर्चेला ‘उधाण’, नंतर पोस्ट डिलीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देश नवीन वर्षाच्या सिलेब्रिशनमध्ये मग्न असताना नाराज असेलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या या पोस्टमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात आणखी दुरावा वाढला आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर संजय राऊत यांनी ट्विट करून आपल्या हटके अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान संजय राऊत यांच्या फेसबुक पोस्टवरून चर्चा सुरु झाल्यानंतर संजय राऊत यांनी ही पोस्ट फेसबूकवरुन डिलीट केली आहे.
Post
संजय राऊत यांनी डिलीट केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपके ये तीन भेट दी हो, साथ, समय, और समर्पण… अशी पोस्ट केली होती. तर त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी, साल या कॅप्शनखाली त्यांनी जरुर बदल रहा है, लेकिन साथ नहीं, स्नेह सदा बना रहे |…अशी पोस्ट करून त्यांनी हात जोडलेला फोटो शेअर केला आहे.

संजय राऊत नाराज ?
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेनेकडून जाहिर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुनिल राऊत यांना स्थान नसल्याचे समोर आल्यानंतर सुनील राऊत हे नाराज असल्याचे वृत्त पसरले. तसेच या नाराजीमुळे संजय राऊत देखील शपथविधीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संजय राऊत देखील नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला फेसबुक पोस्ट केल्यामुळे राजयकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?